Friday, November 12, 2010

अजूनही झाडं माझ्याशी असेच बोलतात

अजूनही झाडं माझ्याशी असेच बोलतात विचारांच्या पसार्यात पानांबरोबर नेतात
हिवाळ्यातले त्यांचे रूप त्यानाही बघवत नाही,
बिना पानांचे सापळे त्याना ही ओळखू येत नाहि
वासंतासाठी बिचारे आसुसलेले असतात
अजूनही झाडं माझ्याशी असेच बोलतात

नविन पालवी घेऊन नटायला त्यांनाही आवडते,
नटायची हौस त्यांनाही तर असते
सजलेले रुप त्यांचे पाण्याच्या आरशात बघतात
अजूनही झाडं माझ्याशी असेच बोलतात

झाडे सुद्धा माणसांसारखी विचार करतात
कडू-गोड नाती जपून ठेवतात
पडलेल्या झाडांकडे ओशाळून बघतात
अजूनही झाडं माझ्याशी असेच बोलतात

कधी ढगांशी सलगी आणि पाउसाचा राग,
कधी सूर्याची सलगी आणि धुक्याचा राग
तहानलेली आस मात्र पाऊसानेच भागवतात
अजूनही झाडं माझ्याशी असेच बोलतात
विचारांच्या पसार्यात पानांबरोबर नेतात

No comments: