...तो बकुळ ... मनातला, बहरातला.....
रोजचाच दिवस, सकाळी आवरून मुलाला शाळेत पाठवून ऑफिसला निघाले होते, निघे पर्यंतची घाई संपवून, गाडीत स्थिर -स्थावर होतच होते. आता गाणे ऐकावे का बातम्या, ह्या विचारात असताना एकदम रस्त्याच्या बाजूला नजर गेली .. ... आणी रस्त्याने दुतर्फा फुललेल्या झाडांकडे पाहून राहवेना. वसंत ऋतूचे आगमन होऊन सर्व झाडांनी असंख्य रंगाची पांघरूण ओढली आहेत असे दृश्य ....काय अप्रतिम होते. वसंताची खरी कमाल ही अमेरिकेला येऊनच कळली. लाल, पांढरे, गुलाबी, पिवळे असंख्य रंग आणी सुगंध..... सर्व झाडं इतकी दिमाखात रंग मिरवत वार्याच्या छोट्या झुळूकेवर हलत होती "ती सर्व मनातूनही ती तितकीच टवटवीत आणी बहरलेले असतील का?" माझ्या मनाला लगेच प्रश्न पडला. माझे मन कायम दुसर्याच्या मनाचाच शोध घेत असते ... व्यक्तींच्या पलीकडे जाऊन आता निसर्गाशी ही माझ्या मनाचा संवाद चालू होतो ... आणी तो आईकायाला माझे मलाच खूप आवडते ... मी तेव्हा एक श्रोता असते, माझे मनच तेव्हा कुठे फिरून काय काय बोलत असते मलाच काळत नाही ... असेच ते आज त्या बहरलेल्या झाडांशी बोलत होते ... रस्ता संपला, गाडी ऑफिसला पोहोचली तरी मनाचा संवाद चालूच होता ...
...
माझ्या मानाने त्या झाडांची चौकशी करता करता त्यांच्या बहराची तुलना माझ्या लहानपणी माझ्या आजोळी सोलापूरला बहरलेल्या त्या बकुळीच्या झाडाशी केली होती. मनाने त्या बकुळीचे वर्णन त्या सर्व झाडाना केले होते ... तीव्र उन्हाळ्यात , रण -रण त्या उन्हात, सुट्टी साठी मी आजोळी दर वर्षी जायचे ... आणि आजीच्या घरी जवळच्या बकुळीच्या झाडाची फुलं वेचून त्याच्या माळा करायचा. आजी कौतुकाने सर्व फुलं वापरायची आणि पुन्हा आणायला धाडायची, किती हौस आणि किती सोस! कधी कधी तर फुले नको असली तरी नुसतेच वासाला आणायचे आणि तासनतास ते वेचण्यात घालावायाचे .. तो बकुळ आजून तासाच्या तसाच आहे, बहरलेला... मन सांगत होते ... माझ्या मानाने त्या बकुळाशी इतके नाते जोडले होते कल्पनाच नव्हती ... तो कायमच कसा फुललेला असतो ?
बरोबर आहे तो मनातच फुलणार आता नाही का? कारण काही महिन्यांपूर्वीच पुन्हा माझ्या लेकाला दाखवायाला सोलापूरला जाण्याचा योग आला, त्या बकुलीच्या ठिकाणी एक उंच इमारत होती. असणारच काळ पुढे सरकला पंचवीस एक वर्ष उलटली, तो बकुळ आता थोडाच राहणार आहे. झपाट्याने होणार्या इमारतींच्या गर्दीत तो केव्हाच गेला...कोणाला कळलेच नसेल ....पण माझ्या लहानपनीच्या सर्व नात्यान सारखा तो बकुळ अजून मनात टव-टवीत आहे बंद कुपीतल्या आत्ताराचा गंध, अजून सुगंधीत होतो तशी ही सर्व जुनी नाती जिवंत आणि सुगंधी आहेत ...त्या नात्यांचे असेच असते, हवी तेव्हा बरोबर असतात... लपून-छपून आधार देतात....
तू समोर नाहीस पण कळते तुझी साद मला, मनात बकुळ फुलतो खरा दिसला नाही तरी त्याचा सुंगंध जाणवतो ना ... असाच वर्षनुवर्ष....
तुझ्या माझ्यातले नाते
काय आहे शोधू पाही
कधी पाण्यासाठी आसूस
कधी वसंताची माती
काय करु थांबवेना
मनाचीया घालमेल
कधी नुसतीच इच्छा
कधी काहीच नाही
जुनी जुनी ही नाती
ओलावा तसाच राही
कधी पाण्यावरची फुंकर
कधी वादळाची घाई
बहर येतो आणि जातो ...
रुतु फुलातो आणि गोठतो
तुझी आठवण होते तेव्हा
काळ थांबलेला असतो

No comments:
Post a Comment