Friday, November 12, 2010

गझल आणि मी .....

गझल आणि मी .....
आज एक सुंदर ब्लॉग वाचला, गझल वरती होता तो आणि त्या मध्ये ह्या गझलची लिंक पण होती http://www.youtube.com/watch?v=zZEoUPd7mLs&feature=related .

वा... सकाळी सकाळी जगजीत सिंघजींचा आवाज ऐकला आणि स्वर्गात पोहोचले.. काय योगा-योग आहे, बाहेर जोराचा पाउस पडत होता आणि ऐकत होते मी "हजारो ख्वाइशे ऐसी के हर ख्वाइश पे दम निकले...."
शहारा, रोमांच ह्या वर मीच बरेच काही लिहिलेले आहे, परंतु बाहेर पाउस पडत असताना ही गझल ऐकून हृदयाचा जो काही ठोका चुकला त्याचे वर्णन करणे मला तर केवळ अशक्य आहे. तो जगजीत सिंघजींचा आवाजाचा पहिला स्वर म्हणजे त्या पहिल्या पाउसाच्या थेम्बा सारखा अंगावर येतो आणि जी काही हृदयात खळबळ होते त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. अर्थ वगैरे गोष्टी त्या गझल च्या खूप नंतर कळायला लागतात... पहिला पोहोचतो तो त्यांच्या आवाजातला खोलावा.. ओलावा.. मार्दव...आणि त्यामुळे मनात निर्माण होणारी शांतता.

बघा ना.. पाउस ही गोष्ट प्रत्येक सौवेदानाशील माणसाला असे का करून टाकते समाजात नाही. खूप खळबळ आणि बचैनी होते कधी कधी पाउस पडत असताना, तर कधी कधी पाउस मला इतके शांत करून टाकतो की पाउस पडत असताना काही बोलावे, सांगावे, लिहावेसे वाटत नाही. आज अशीच ह्या पाउसात आणि जगजीतजींच्या गझल मध्ये इतकी ओली चिंब भिजले आहे..पण का कुणाच ठाऊक आज मात्र हे लिहायची तीव्र इच्छा आहे.. बघुयात गझलची काय जादू आहे...
हजारो ख्वाइशे ऐसी के हर ख्वाइश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले
मुहोबात में नहीं है फर्क जीने और मरने का
उसी को देख कर जीते है जिस काफिर पे दम निकले...
खर तर ही गझल कोणाची हे मला माहित नाही.. माहित करून घ्यावेसे सुरुवातीला वाटले पण नाही, त्या संगीताने आणि त्या आवाजानेच मनाचा इतका पगडा घेतला होता की इतर काही विचारच केला नाही.. हळू-हळू जसजशी त्या संगीताची जादू संपली तस-ताशी मी वास्तवाकडे आले.. त्या गझल विषयी विचार करू लागले... खरच किती आकांक्षा, इच्छा असतात आपल्या मनात .. साठवून ठेवतो आपण साठवातच राहतो सतत... सारखे काहीतरी मिळवायचे असते, काहीतरी करायचे असते, त्याचाच ध्यास असतो आपल्याला ..जे सुटले त्याचे ओढ मनात राहिलेली असते. ह्या प्रत्येक ओढीवर जीव ओतून टाकावा अश्या ह्या ओढी असतात. त्याचा सतत ह्व्यासच आपल्याला चालयची शक्ती देत असतो. त्यामुळे कधी कधी भीती वाटते की ही काहीतरी सतत हवे असण्याची इछाच नष्ट झली तर कसे जगायचे? कशा साठी जगायचे? आणि ह्याच विचारावरून पुढे ह्या ओळी सुचल्या...बघा आवडतात का..
हर ख्वाइश पे जाम लेते है नशे में ही दम निकले
और ख्वाइश में तड़पना कशिश में सिख लेते है
अधूरी ख्वईशोंका ये सिल-सिला कभी ख़तम हो जाये
जीयु किस ख्वाइश में कोई मुज्हे ये समझाये...

चला बरेच लिहिले... खूप काही लिहायचे आजून बाकी आहे.. राहिले तिथून उद्या पुन्हा सुरु करू.. मना मध्ये हीच अपूर्णतेची भावना ठेवूनच थांबवते...

No comments: