वर्ष सरता सरता भान उरलेच नाही
पण पळताना सारखे काही बोचत राही
कुठूनसा आला तो एक दिवस मनाचा
भेटला सखीला सवंगडी मनाचा
काय सांगू काय नको किती वादळे मनात
सरलेल्या दिवसांची साखळी स्वप्नात
तिथूनच सुरु झाली मनाची सावली
सावली वर झालर अनेक आकांक्षांची
किती बोलले मी तेव्हा सर्व सांगून टाकले
परी भासे अजून मला सर्व जपून ठेवले
मनाचा आधार मनाशीच खेळ
अंतर दिवसाचे पण भास सतत
भावनांचा उद्वेग मग शब्दात पसरला
विळख्यात त्याच्या असा श्वास अडकला
कधी येते अंधारून, पाउस बरसतो वनात
त्याची आठवण तेव्हा, होते असह्य उरात
गीते अनेक रचून उडतात गगनात
गीतातून भेटतो मला मनीचा सखा ग
वर्ष सरता सरता भान उरलेच नाही
पण बोचलेले आता नुसते खुपत राही ....
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment