Friday, November 12, 2010

त्या व्याकुळ संध्याकाळी

त्या व्याकुळ संध्याकाळी
मी दूर एकटाच बसतो
क्षितिजावर लाली केशरी
एकटाच न्ह्याहाळत असतो

असतो भास तुझा तो
वार्यातून वाहणारा
कधी बरसेल पाउस
विचारतो गगनाला

शब्द ओठी कवींचे
कितीदा समजावलेले
पुन्हा येती पुढती
मर्म नवेच त्यातले

तू येशील विजेवर स्वार
पाउसाचा पसरवून भार
घेशील मजला कवेत
एकवार चमकून

भान

वर्ष सरता सरता भान उरलेच नाही
पण पळताना सारखे काही बोचत राही

कुठूनसा आला तो एक दिवस मनाचा
भेटला सखीला सवंगडी मनाचा
काय सांगू काय नको किती वादळे मनात
सरलेल्या दिवसांची साखळी स्वप्नात

तिथूनच सुरु झाली मनाची सावली
सावली वर झालर अनेक आकांक्षांची
किती बोलले मी तेव्हा सर्व सांगून टाकले
परी भासे अजून मला सर्व जपून ठेवले

मनाचा आधार मनाशीच खेळ
अंतर दिवसाचे पण भास सतत
भावनांचा उद्वेग मग शब्दात पसरला
विळख्यात त्याच्या असा श्वास अडकला

कधी येते अंधारून, पाउस बरसतो वनात
त्याची आठवण तेव्हा, होते असह्य उरात
गीते अनेक रचून उडतात गगनात
गीतातून भेटतो मला मनीचा सखा ग

वर्ष सरता सरता भान उरलेच नाही
पण बोचलेले आता नुसते खुपत राही ....

रोमांच

हिरवी पालवी हळूच लाजावी
हातातली बेडी निखळून पडावी
लालबुंद त्या अधारांवरती
दीड-दा तार जणू सुरेल व्हावी ..

रोमांच असे की शरीरामाधुनी
एक अनामिक शीळ निघवी
श्रुष्टी मधल्या तरु-पर्णची
जणू शहारून मान झुकवी

रचलेले काव्य रुचत नाही
जुळवलेले गाणे खुलत नाही
भावनेशिवाय अविष्कार
स्वतःचा आकार धरतच नाही

Celebration of fall

Another season of fall,
A season I call remembrance...
Its the glory of finer things
Celebration of untouched moments with vibration of colors...

Every year it comes and goes
It always makes a mark
With the leaves it takes my heart
to a land of unspoken art

Old memories come back
during this season of fall
I cherish old times, remember old pals
savour those moments, I have kept in my heart

I like to think, I like to sing
I like to marvel this season of art
I like to be alone in woods
In the company of the tall
I smell the season and its feathers
who are together to be apart...

The crispness in the air
The heaviness of the trees
Its the feeling of satisfaction
upon them I perceive

Chirping birds fly home,
squirrels get ready for dark
I turn in with satisfying silence
To welcome another pause

"Celebration of Fall....." by Priya Vaidya (October 2009)

...तो बकुळ ... मनातला, बहरातला.....
रोजचाच दिवस, सकाळी आवरून मुलाला शाळेत पाठवून ऑफिसला निघाले होते, निघे पर्यंतची घाई संपवून, गाडीत स्थिर -स्थावर होतच होते. आता गाणे ऐकावे का बातम्या, ह्या विचारात असताना एकदम रस्त्याच्या बाजूला नजर गेली .. ... आणी रस्त्याने दुतर्फा फुललेल्या झाडांकडे पाहून राहवेना. वसंत ऋतूचे आगमन होऊन सर्व झाडांनी असंख्य रंगाची पांघरूण ओढली आहेत असे दृश्य ....काय अप्रतिम होते. वसंताची खरी कमाल ही अमेरिकेला येऊनच कळली. लाल, पांढरे, गुलाबी, पिवळे असंख्य रंग आणी सुगंध..... सर्व झाडं इतकी दिमाखात रंग मिरवत वार्याच्या छोट्या झुळूकेवर हलत होती "ती सर्व मनातूनही ती तितकीच टवटवीत आणी बहरलेले असतील का?" माझ्या मनाला लगेच प्रश्न पडला. माझे मन कायम दुसर्याच्या मनाचाच शोध घेत असते ... व्यक्तींच्या पलीकडे जाऊन आता निसर्गाशी ही माझ्या मनाचा संवाद चालू होतो ... आणी तो आईकायाला माझे मलाच खूप आवडते ... मी तेव्हा एक श्रोता असते, माझे मनच तेव्हा कुठे फिरून काय काय बोलत असते मलाच काळत नाही ... असेच ते आज त्या बहरलेल्या झाडांशी बोलत होते ... रस्ता संपला, गाडी ऑफिसला पोहोचली तरी मनाचा संवाद चालूच होता ...
...
माझ्या मानाने त्या झाडांची चौकशी करता करता त्यांच्या बहराची तुलना माझ्या लहानपणी माझ्या आजोळी सोलापूरला बहरलेल्या त्या बकुळीच्या झाडाशी केली होती. मनाने त्या बकुळीचे वर्णन त्या सर्व झाडाना केले होते ... तीव्र उन्हाळ्यात , रण -रण त्या उन्हात, सुट्टी साठी मी आजोळी दर वर्षी जायचे ... आणि आजीच्या घरी जवळच्या बकुळीच्या झाडाची फुलं वेचून त्याच्या माळा करायचा. आजी कौतुकाने सर्व फुलं वापरायची आणि पुन्हा आणायला धाडायची, किती हौस आणि किती सोस! कधी कधी तर फुले नको असली तरी नुसतेच वासाला आणायचे आणि तासनतास ते वेचण्यात घालावायाचे .. तो बकुळ आजून तासाच्या तसाच आहे, बहरलेला... मन सांगत होते ... माझ्या मानाने त्या बकुळाशी इतके नाते जोडले होते कल्पनाच नव्हती ... तो कायमच कसा फुललेला असतो ?
बरोबर आहे तो मनातच फुलणार आता नाही का? कारण काही महिन्यांपूर्वीच पुन्हा माझ्या लेकाला दाखवायाला सोलापूरला जाण्याचा योग आला, त्या बकुलीच्या ठिकाणी एक उंच इमारत होती. असणारच काळ पुढे सरकला पंचवीस एक वर्ष उलटली, तो बकुळ आता थोडाच राहणार आहे. झपाट्याने होणार्या इमारतींच्या गर्दीत तो केव्हाच गेला...कोणाला कळलेच नसेल ....पण माझ्या लहानपनीच्या सर्व नात्यान सारखा तो बकुळ अजून मनात टव-टवीत आहे बंद कुपीतल्या आत्ताराचा गंध, अजून सुगंधीत होतो तशी ही सर्व जुनी नाती जिवंत आणि सुगंधी आहेत ...त्या नात्यांचे असेच असते, हवी तेव्हा बरोबर असतात... लपून-छपून आधार देतात....
तू समोर नाहीस पण कळते तुझी साद मला, मनात बकुळ फुलतो खरा दिसला नाही तरी त्याचा सुंगंध जाणवतो ना ... असाच वर्षनुवर्ष....

तुझ्या माझ्यातले नाते
काय आहे शोधू पाही
कधी पाण्यासाठी आसूस
कधी वसंताची माती
काय करु थांबवेना
मनाचीया घालमेल
कधी नुसतीच इच्छा
कधी काहीच नाही
जुनी जुनी ही नाती
ओलावा तसाच राही
कधी पाण्यावरची फुंकर
कधी वादळाची घाई
बहर येतो आणि जातो ...
रुतु फुलातो आणि गोठतो
तुझी आठवण होते तेव्हा
काळ थांबलेला असतो

अजूनही झाडं माझ्याशी असेच बोलतात

अजूनही झाडं माझ्याशी असेच बोलतात विचारांच्या पसार्यात पानांबरोबर नेतात
हिवाळ्यातले त्यांचे रूप त्यानाही बघवत नाही,
बिना पानांचे सापळे त्याना ही ओळखू येत नाहि
वासंतासाठी बिचारे आसुसलेले असतात
अजूनही झाडं माझ्याशी असेच बोलतात

नविन पालवी घेऊन नटायला त्यांनाही आवडते,
नटायची हौस त्यांनाही तर असते
सजलेले रुप त्यांचे पाण्याच्या आरशात बघतात
अजूनही झाडं माझ्याशी असेच बोलतात

झाडे सुद्धा माणसांसारखी विचार करतात
कडू-गोड नाती जपून ठेवतात
पडलेल्या झाडांकडे ओशाळून बघतात
अजूनही झाडं माझ्याशी असेच बोलतात

कधी ढगांशी सलगी आणि पाउसाचा राग,
कधी सूर्याची सलगी आणि धुक्याचा राग
तहानलेली आस मात्र पाऊसानेच भागवतात
अजूनही झाडं माझ्याशी असेच बोलतात
विचारांच्या पसार्यात पानांबरोबर नेतात

विवेचन

विनये वाचिता विवेचन

मानसी होते स्मरण

न लागे मूर्ती समोर

चित्त निर्मळ तरल ||१||

खूप ऐकिता प्रवचन

मनी शांतता भरून

साठवून शक्ती मनात

हुरूप आणावा आचरणात ||२||

गीत ओठातले, स्वर हृदयातले,
आले कुठूनसे, मेघ श्रावणातले,

गंध दाटे उरी, मुग्ध श्वासातुनी,
हवा स्पर्श तुझा, लाज नाही बरी,

स्वर मेघातले, तुषार चोहीकडे,
लय त्याची धरून, सांज गगनी चढे,

रात होऊ नये, निशा दाटू नये
तुझ्या श्वासाची हि, नशा उतरू नये

मेघ जाणार ते, नाही थांबणार ग,
गीत ओठी तुझे, तरी राहणार ग,
ओठी राहणार ग.
सर्वच फुलं आवडली तरी सगळी काही सारखी नसतात
काही वासाची, काही बघायची काही नुसतीच जपायची असतात

धुक्याची झालर.....

तुला हवा गगनातला तारा,
तुला हवा स्पर्श मनोरा,
तुल हवी वलयतील नक्शी,
नको तुला वचनांचा पसारा

तुला हवे चित्रतील तारे
तुला हवे स्वपनांचे निवारे
तुला हवी धुक्याची झालर
नको तुला बंधनाचे ओझे

तुला हवा एकांताचा निवारा
तुला हवा स्पंदनांचा ओलावा
तुल हवा मयेचा गंध
नको तुला प्रपंचाचा पसारा
पहेली बनके तुम ऐसी आती हो सामने,
पकड़ ना पाउ तुम्हे,
जुलफोमें ऐसे सिमट जाते हो हलके,
छुड़ा ना पाउ तुम्हे,

वादा किया था मैंने मुझसे
भूलजाने का तुम्हे
फिर क्यों मिलता रहता हु तुम्हे
तितलीयोंके रंगों में

बारिश की बूंदोंमें नजर आती है
तुम्हारी मुसकान सदा
सास में मेरे तुम्ही तुम हो बसे,
कैसे निकालू तुम्हे?

इतफाक से अगर मिल जाओ कभी तो
बोल नहीं पाऊंगा
बस देखता रहूंगा तुम्हे देर तक
मेरे दिल की आखोंसे
थोडतरी पावसात भिजून घे

हा क्षण असा दवडू नको
वार्याला मागे फिरवू नको
थोडतरी पाणी पिऊन घे
थोडतरी पावसात भिजून घे

तहान नंतर लागेल गं
मी तेव्हा नसेन गं
स्पर्षाने तहान भागवून घे
थोडतरी पावसात भिजून घे

हूर-हूर नंतर लागेल गं
साथ तेव्हा नसेल गं
आठवणी साठी बिलगून घे
थोडतरी पावसात भिजून घे
एक शब्द तान्हावलेला, भावने साठी थांबलेला
एक भावना थांबलेली, स्पर्शा साठी आसुसलेली,
एक स्पर्श आसुसलेला, भेटी साठी तगमगलेला ...

मम्माईचा मून-चंद्र

मम्माईचा मून-चंद्र
लहान मुलांच्या त्या निरागस अबोध वयातल्या अनेक गमती-जमती असतात. नुकतीच बोलायला शिकलेली किंवा शिकत असणारी मुलं असतील तर त्यांच्या गमतींना उधाणच येते. कदाचित ती मोठी झाल्यावर त्यांच्या आणि आपल्या लक्षातही रहाणार नाहीत अशाच हया छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या वयात आणि त्या अवस्थेत त्या आपल्याला कमालीचा आनंद देऊन जातात. अशीच चंद्रा विषयीची निनादच्या बाबतीतली आठवण लिहून ठेवावीशी वाटते. कदाचित मोठा झाल्यावर त्याला सुद्धा आठवायला आणि ऎकायला आवडेल अशीच.....
"मम्माई मम्माई मून-चंद्र गाणं बोलं...."..."मम्माई मून-चंद्र गाणं बोलं...." हे वाक्य मम्माई गाणं सुरु करे पर्यंत म्हणत बसणारा माझा लाडका निनाद.. जाता-जाता ह्या मम्माई विषयी सांगते. दादू-आजींनीं शिकवलेले "मम्मा" आणि आजी-आजोबांनी शिकवलेले "आई" यांची संधी जुळवून बनवलेले "मम्माई" हे माझे सध्याचे नाव. हे लिहिण्याचा आजचा विषय नाही, पण जाता जाता ते सांगणे अपरिहार्य होते. तरं "मून-चंद्र" हे त्याचे सध्याचे दैवत (निनादच्या सध्याच्या भाषेत सर्व गोष्टी त्यांच्या मराठी आणि इंग्रजी शब्द जोडून बनवलेल्या एका संधीयुक्त शब्दाने ओळखल्या जातात.... जसे मून-चंद्र पाणी-वौटर... वगैरे वगैरे ...चुकून तुम्हाला एकच भाषा येत असेल तर? तो तुम्हाला समजेल ह्याची खात्री करुन घेतो.) ..तर निनादला अगदी लहानपणा पासून चंद्राची प्रचंड ओढ वाटते. इंग्रजी भाषेत ह्यालाच आपण attraction म्हणू. बहुतेक माझ्या आठवणी प्रमाणे ५-६ महिन्यांचा असल्यापासून, "चांदोबा-चांदोबा भागलास का?" हे गाणं तो मनापासून ऎकतो. ..आता सव्वादोन वर्षांचा तो ते म्हणतो पण ... ते गाणे त्याला केव्हाही ऎकायला आवडते, अनेक चालीं मधून पण ऎकायला आवडते... लहानपणा पासून आणि साधारण १ वर्षापासून त्याला मून-चंद्र पहायला पण अतिशय आवडतो. गाडीत बसून सतत त्याची नजर आकाशात चंद्र शोधत असते... सर्वात आधी कायम त्यालाच तो दिसतो. चंद्राच्या बारीक मुखड्याचा भास होताच ..." मम्माई मून-चंद्र sss...बघ" असे जोरात ओरडत तो सर्वांना त्याच्या आनंदात सहाभागी करुन घेतो. थंडी मधे इथे बरेच वेळा ढगाळ वातावरण असते तेव्हा "मम्माई चंद्र झोपला आहे, किंवा मम्माई चंद्र ढगांच्या मागे लपला आहे, असे मनाशी पुटपुटतो, मम्माई कडून ते कसे बरोवर आहे ह्याची खात्री करुन घेतो. त्या आकाशातल्या चांदोबाची आई पण त्याला गाणी म्हणत असेल मगं तो झोपत असेल--असे सर्व चांदोबाच्या घराचे आणि परिसराचे चित्र डोळ्यांसमोर आणून त्याचे वर्णन करतो. नुसत्या चंद्रा विषयी कल्पनाच नाही तर चंद्रा विषयीची अनेक विविध गाणि ऎकायला आणि गायला तो उत्सुक असतो. असे का होत असेल आणि चंद्र ही गोष्ट त्याला इतके का भारावून टाकते मला तरी अजून समजलेले नाही. ..मग ती चांदोबा गुरुजींची शाळा असो किंवा निंबोणिच्या झाडा मागचा चंद्र असो, कुठलाही चंद्र त्याला झोपताना शांत करतो ही तर गोष्ट मला जाम गमतीची वाटते. सतत फिरणारा, दंगा-मस्ती करत हिंडणारा निनाद जेव्हा चांदोबाचे गाणे ऎकून शांत होऊन झोपतो तेव्हा मला चंद्र हे शांततेचे प्रतिक आहे ह्याची खात्रीच पटते. .. कदाचित अमेरिकेतला चंद्र प्रदुषण कमी असल्याने जास्त स्वच्छ: पांढरा दिसतो का? असाही एक विचार मनात येऊन गेला आणि निनाद पुण्यात वाढला असता तरी सुद्धा त्याला चंद्रा विषयी इतकीच ओढ असती का? ह्या प्रश्नाचेही ऊत्तर "हो" असेच आले. कारण चंद्गा विषयीची आवड त्याला उपजतच आहे आणि त्याच्याबद्द्लची गाणि आणि गोष्टी ऎकून ती व्रुद्धींगत झाली आहे असेच म्हणावे लागेल....
आता ह्ळूहळू निनादला गुलजार किंवा जावेद अख्तरांचा चंद्रही भासवावा असे मनात येत आहे. त्यामुळे जसजसा निनाद मोठा होईल तसतसे त्याला चंद्रा विषयी अजून गाणि, काव्य, लेखन, अनुभव तर मिळतीलच... पण त्याच बरोब्रर त्याला शांत, निर्मळ मनं आणि चित्तलाभावे हेच मागणे त्या चंद्रा कडे आमच्या दोघांचे असेल.....
--सौ. प्रिया वैद्य
Shrewsbury, MA

गझल आणि मी .....

गझल आणि मी .....
आज एक सुंदर ब्लॉग वाचला, गझल वरती होता तो आणि त्या मध्ये ह्या गझलची लिंक पण होती http://www.youtube.com/watch?v=zZEoUPd7mLs&feature=related .

वा... सकाळी सकाळी जगजीत सिंघजींचा आवाज ऐकला आणि स्वर्गात पोहोचले.. काय योगा-योग आहे, बाहेर जोराचा पाउस पडत होता आणि ऐकत होते मी "हजारो ख्वाइशे ऐसी के हर ख्वाइश पे दम निकले...."
शहारा, रोमांच ह्या वर मीच बरेच काही लिहिलेले आहे, परंतु बाहेर पाउस पडत असताना ही गझल ऐकून हृदयाचा जो काही ठोका चुकला त्याचे वर्णन करणे मला तर केवळ अशक्य आहे. तो जगजीत सिंघजींचा आवाजाचा पहिला स्वर म्हणजे त्या पहिल्या पाउसाच्या थेम्बा सारखा अंगावर येतो आणि जी काही हृदयात खळबळ होते त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. अर्थ वगैरे गोष्टी त्या गझल च्या खूप नंतर कळायला लागतात... पहिला पोहोचतो तो त्यांच्या आवाजातला खोलावा.. ओलावा.. मार्दव...आणि त्यामुळे मनात निर्माण होणारी शांतता.

बघा ना.. पाउस ही गोष्ट प्रत्येक सौवेदानाशील माणसाला असे का करून टाकते समाजात नाही. खूप खळबळ आणि बचैनी होते कधी कधी पाउस पडत असताना, तर कधी कधी पाउस मला इतके शांत करून टाकतो की पाउस पडत असताना काही बोलावे, सांगावे, लिहावेसे वाटत नाही. आज अशीच ह्या पाउसात आणि जगजीतजींच्या गझल मध्ये इतकी ओली चिंब भिजले आहे..पण का कुणाच ठाऊक आज मात्र हे लिहायची तीव्र इच्छा आहे.. बघुयात गझलची काय जादू आहे...
हजारो ख्वाइशे ऐसी के हर ख्वाइश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले
मुहोबात में नहीं है फर्क जीने और मरने का
उसी को देख कर जीते है जिस काफिर पे दम निकले...
खर तर ही गझल कोणाची हे मला माहित नाही.. माहित करून घ्यावेसे सुरुवातीला वाटले पण नाही, त्या संगीताने आणि त्या आवाजानेच मनाचा इतका पगडा घेतला होता की इतर काही विचारच केला नाही.. हळू-हळू जसजशी त्या संगीताची जादू संपली तस-ताशी मी वास्तवाकडे आले.. त्या गझल विषयी विचार करू लागले... खरच किती आकांक्षा, इच्छा असतात आपल्या मनात .. साठवून ठेवतो आपण साठवातच राहतो सतत... सारखे काहीतरी मिळवायचे असते, काहीतरी करायचे असते, त्याचाच ध्यास असतो आपल्याला ..जे सुटले त्याचे ओढ मनात राहिलेली असते. ह्या प्रत्येक ओढीवर जीव ओतून टाकावा अश्या ह्या ओढी असतात. त्याचा सतत ह्व्यासच आपल्याला चालयची शक्ती देत असतो. त्यामुळे कधी कधी भीती वाटते की ही काहीतरी सतत हवे असण्याची इछाच नष्ट झली तर कसे जगायचे? कशा साठी जगायचे? आणि ह्याच विचारावरून पुढे ह्या ओळी सुचल्या...बघा आवडतात का..
हर ख्वाइश पे जाम लेते है नशे में ही दम निकले
और ख्वाइश में तड़पना कशिश में सिख लेते है
अधूरी ख्वईशोंका ये सिल-सिला कभी ख़तम हो जाये
जीयु किस ख्वाइश में कोई मुज्हे ये समझाये...

चला बरेच लिहिले... खूप काही लिहायचे आजून बाकी आहे.. राहिले तिथून उद्या पुन्हा सुरु करू.. मना मध्ये हीच अपूर्णतेची भावना ठेवूनच थांबवते...