हिच वाट चालु या,
हेच गीत गाऊ या,
शब्द-बंध जुळवूनी,
मना-मनात राहुया…
दिवसांचा विसर पडे,
अंतराचे भान नसे,
मनाच्या ह्या बंधनाला,
भावनेची हाक पुरे...
ओलावा स्पशाचाही,
शब्दातून असा फुलावा,
वेदनेचाही भास मग,
श्वासाविना कळावा…
साथ असेही शब्दांची,
जोड तिला सूर तालाची,
मंगल गाणे असेच आपण
अखंड छेडुया…
हिच वाट चालु या,
हेच गीत गाऊ या,
शब्द-बंध जुळवूनी,
मना-मनात राहुया…
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment