Monday, February 9, 2009

सांजवेळी

सांजवेळी सागरात सोनपिवळी शिल्प-लाट,
गहिवरल्या श्वात आपुल्या, सुमंगल झाली पहाट,
बावरलीस का तू, सांग अशी गं?
नाही वारा, नाही पक्षी,
तुझ्या अवीट सौंदर्याला आज मी एकटाच साक्षी,
शिल्प-लाट खडकांची साथ,
चमकणारी रेती शोभते हातात,
कशी सांगू तुला, तनुची अस्थीरता
त्या एका स्पर्शासाठी आसुसली लालसा.....

No comments: