Wednesday, October 7, 2009

अनेक मनोरे रचलेले असतातअनेक आशा साठवलेल्या असत्तातअनेक उड्या मारायच्या असत्तातपण कुठेतरी कोपरयात लिंबा एवढे नैराष्य मागे खेचत असतेकरु का नको करु ह्या द्वंद्वात सतत पकडून ठेवणारे ते नैराष्य,कसे झटकावे ह्याच प्रयत्नात कायम मन आडकलेले,अनेक प्रयत्न करुन कंटाळ्लेले, थकलेले ...

असे असताना, एकदमच अचानक एक दिवस वेगळा उजाडतो... समाधानाला मी घट्ट कवटाळते
स्वतंत्र विचारांना मिठी मारते आणि उधळलेल्या घोड्यावर स्वार होऊन मी स्वपनांच्या राज्यात निघते ओळखीच्या रसत्यांवरुन गाडी चालू असते
लगामही हातात असतो
मंद वारयाची झुळुक खिडकीतून डोकावत असते
त्याच्या लईवर डोलणार संगीत साथीला असते
दडपण आणणारे नैराष्य मग अचानकच गायब होते
आणि पुन्हा नविन पावले उचलायला मी मोकळी होते......